पिंपरीत अल्पवयीन गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

48
murder

सामना ऑनलाईन, पिंपरी

जुन्या मुंबई-पुणे रोडवर एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. सुभान शेख असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. देहूरोड मधील सेंट्रल चौकात सोमवारी रात्री ११ च्या सुमारास त्याचा खून करण्यात आला असावा असा संशय आहे. सुभान हा गांधीनगर देहूगांव येथील रहिवासी होता. एका मोटर सायकलस्वाराने सुभान शेख जखमी अवस्थेत रोडवर पडलेला दिसला त्याला त्वरित आधार हॉस्पिटल मध्ये केले दाखल केले परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना एक मोठा दगड दिसला, ज्याच्याने वार करून सुभानचा खून केला असावा असा पोलिसांना संशय आहे. सुभान शेख हा अल्पवयीन गुन्हेगार होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या