सोफा सेट घेऊन न दिल्याने नवविवाहितेची आत्महत्या ?

बेळगावातील एका नवविवाहीत तरूणीने आत्महत्या केली आहे. अत्यंत शुल्लक कारणासाठी तिने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. ज्योती चोपडे असं या तरूणीचे नाव असून ती अवघ्या 19 वर्षांची होती. बुधवारी (21 ऑक्टोबर 2020) सकाळी तिने आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं. ज्योतीने तिच्या वडिलांकडे सोफा सेट घेऊन देण्याची मागणी केली होती. वडिलांनी ही मागणी पूर्ण न केल्याने ज्योती निराश झाली होती. या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

jyoti-chopde

ज्योती ही मूळची सुळगा इथली राहणारी होती. तीन महिन्यापूर्वीच ज्योतीचं लग्न उचगांव इथे राहणाऱ्या  येथील निखिलशी झालं होतं. दोन -चार दिवसांपूर्वी ती तिच्या आई-वडिलांकडे राहायला आली होती. ज्योतीची आई काही दिवसांसाठी बाहेर गेली होती. बुधवारी तिचे वडीलही काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधून तिने घरात गळफास लावून स्वत:चे जीवन संपवले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवला होता.

jyoti-chopde-home

अवघ्या 19 वर्षांच्या ज्योतीच्या अशा जाण्याने अनेकांच्या मनाला चटका बसला आहे. ज्योतीने आत्महत्या करण्याचे कारण काय याचा तपास पोलिसांनी केला असता एक क्षुल्लक कारण समोर आलंय. तिने आपले वडिलांकडे सोफासेट खरेदी करण्याचा हट्ट धरला होता. वडिलांनी कारणांमुळे ही मागणी पूर्ण केली नाही, पण आपण लवकरच सोफासेट घेऊ असे त्यानी ज्योतीला सांगितले होते. यामुळे नाराज होऊन बहुधा तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.

ज्योती आणि निखील यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाला सहा महिने देखील झाले नाही तोच त्यांचा संसार ज्योतीने आत्महत्या केल्याने मोडला. मुलीच्या जाण्याने तिच्या वडिलांवर आणि पत्नीच्या जाण्याने निखीलवर आभाळ कोसळलं आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत असतानाच, इतक्या शुल्लक कारणासाठी ज्योतीने हे टोकाचे पाऊल उचलायला नको होते अशी प्रतिक्रिया बहुतांश जणांकडून ऐकायला मिळत आहे.

आजकाल शुल्लक कारणांसाठी आपले जीवन संपवणाच्या घटना वाढत आहेत. आत्महत्येसारखा विचार मनात आला तर त्याबद्दल इतरांशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. इतरांनी खचलेल्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे त्यांना आत्महत्येसारख्या विचारातून परावृत्त करण्याची गरज असते. मात्र त्यासाठी बोललं पाहिजे आणि समोरच्यांनी ते ऐकलंही पाहिजे

आपली प्रतिक्रिया द्या