विधानसभेसाठी महाराष्ट्राची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधियांकडे

1058

महाराष्ट्रात होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधानसभा उमेदवार निश्चित करण्यात सिंधिया यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. राज्यात काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने काँग्रेसच्या दिग्गजांनी विधानसभा निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. त्यातच मुंबई काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणामुळे उमेदवार कसा निवडायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी अधिक उफाळून येण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रासाठी स्क्रिनिंग कमिटीची घोषणा गुरुवारी केली.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचा अधिकार असलेल्या या महत्त्वपूर्ण समितीच्या अध्यपदी ज्योतिरादित्य सिंधिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत राजस्थानचे काँगेस नेते हरीश चौधरी व माणिकम टागोर, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते के.सी. पडावी यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या