लोकेश राहुलचा अनोखा षटकार

32

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थाननं सावध सुरुवात केली आहे. सामन्यात हिंदुस्थाननं नाणेफेक जिंकत प्रमथ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हिंदुस्थानी संघाला सुरुवातीलाच शिखर धवन बाद झाल्यानं धक्का बसला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुलनं संघाची बाजू सांभाळली. या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या राहुलनं शानदार अर्धशतक ठोकलं. राहुलचं हे अर्धशतक खास ठरलं कारण कसोटीत सलग सहाव्यांदा त्यानं अशी कामगिरी केली आहे.

खानपानानंतर खेळण्यास उतरल्यानंतर हिंदुस्थानी संघाला राहुल आणि कोहलीच्या रुपानं लागोपाठ दोन धक्के बसले. विराट १३ धावा करून तर राहुल ५७ धावांवर बाद झाला. या सामन्यात राहुलनं सलग सहावं अर्धशतक ठोकलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ३ सामन्यात सलग ५ अर्धशतकं त्याने केली होती. त्यामुळे पुनरागमन करणाऱ्या राहुलचा फॉर्म कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या