ह्रितिकचा ‘काबिल’अडचणीत येण्याची शक्यता

58

सामना ऑनलाईन।मुंबई

लाईक करा, ट्विट करा

ह्रितीक रोशनचा काबिल हा नवा सिनेमा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्स या प्रक्षेपण आणि निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनीने त्यांच्या एका मालिकेतील कथानकातील पात्रावरून या चित्रपटाची कल्पना चोरली असल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुरू केला आहे.

संजय गुप्ता दिग्दर्शित काबिल सिनेमातील मुख्य पात्र हे अंध दाखवण्यात आलं आहे आणि ही भुमिका ह्रितिक रोशन करत आहे. नेटफ्लिक्सने मार्व्हल कॉमिक्सचं एक पात्र असलेल्या डेअरडेव्हील या मालिकेत अशाच प्रकारचं एक पात्र दाखवलं होतं. डेअरडेव्हील हा एक सुपरहिरो दाखवण्यात आला असून, तो शहरातल्या गुंडांचा कसा नायनाट करतो हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे.

काबिलमधली मुख्य व्यक्तीरेखा , मारहाणीची दृश्य, सिनेमातील रंगसंगती हे सगळं डेअरडेव्हील या मालिकेशी मिळतं जुळतं असल्याचं नेटफ्लिक्सचं म्हणणं आहे. यामुळे संतापलेल्या नेटफ्लिक्सने राकेश रोशन यांच्या फ्लिमक्राफ्ट प्रॉडक्शनविरूद्ध आणि संजय गुप्ता यांच्या व्हाईट फिचर्स फिल्म्सविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुरू केलाय.

काबिलची बॉक्स फीसवर शाहरूख खानच्या रईस या चित्रपटाशी टक्कर होणार आहे, जानेवारीमध्ये हे देन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की शाहरूख खानच्या रेड चिली एंटरटेनमेंटने ३ वर्षांसाठी नेटफ्लिक्सबरोबर करार केला आहे, ज्याअंतर्गत रेड चिली इंटरटेनमेंटने बनवलेले चित्रपट फक्त नेटफ्लिक्सच्या जगभरातील दर्शकांना बघता येतील.

दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की “काबिल चित्रपटात ह्रितिक रोशन हा सुपरहिरो दाखवण्यात आलेला नाहीये. डेअरडेव्हीलमधली मुख्य व्यक्तीरेखा ही सुपरहिरो दाखवण्यात आली असून ती एकावेळीस ३० लोकांशी मारामारी करताना दाखवण्यात आली आहे. असं काहीही काबिलमध्ये दाखवण्यात आलेलं नाही, जर नेटफ्लिक्सने आमच्याविरूद्ध कारवाई करण्याचं ठरवलं तर आम्हीही त्याला योग्य पद्धतीने उत्तर देऊ”

इंग्रजी वृत्तपत्र मुंबई मिररने ही बातमी प्रसिद्ध केली असून त्यांनी नेटफ्लिक्सशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी “आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही” असं सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या