महाराष्ट्र राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

सामना ऑनलाईन । हैदराबाद

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रिशांक देवाडीगाच्या महाराष्ट्र संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबाद येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ३५-३४ असा एका गुणाने पराभव केला. याआधी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा ४४-३६ असा पराभव करुन दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या