‘कबीर सिंग’ चित्रपटाविरोधात मुंबईतील डॉक्टरची आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

सामना ऑनलाईन, मुंबई

शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाविरोधात मुंबईतील एका डॉक्टरने राज्याचे आरोग्यमंत्री, प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटामध्ये डॉक्टरांची भूमिका नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आल्याने डॉ.प्रदीप गाडगे यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट जरी काल्पनिक असला तरी त्यातून वस्तुस्थितीचे विकृत वर्णन केले असल्याचं गाडगे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. चित्रपटामुळे डॉक्टरांच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला असल्याची भावना गाडगे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.