कडावलचे उपसरपंच व तीन ग्राम पंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

गेले काही दिवस माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात  घरघर लागली आहे. आज मंगळवारी कुडाळ तालुक्यातील कडावलचे उपसरपंच व तीन ग्रा पं सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश घेऊन  आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा कडावल मध्ये स्वाभिमान पक्षाला धक्का दिला आहे.

कणकवली विजय भवन येथे मंगळवारी कडावल  गावचे उपसरपंच  विद्याधर मुंज, ग्रामपंचायत सदस्य आनंद तेरसे,  ग्रा. पं. सदस्या मिता मुंज,  ग्रा.पं.सदस्या स्वाती साळूंखे यासह सामाजिक कार्यकर्ते महाबळेश्वर मिराशी, अमोघ मुंज व कडावल मधील ग्रामस्थांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सर्वांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून  पक्षात सर्वांचे स्वागत केले.

प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य मानसन्मान केला जाईल,  विधानसभा निवडणुकीसाठी सर्वानी जोमाने कामाला लागा. आपल्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांपर्यत पोहोचवा. जि प्रलंबित विकास कामे आहेत ती येत्या काळात पूर्ण केली जाणार आहेत. अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, विभाग प्रमुख पप्पू पालव, कडावल शाखा प्रमुख विजय सावंत, संदीप सावंत, आनंद मर्गज, तातू  मर्गज आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

शंभूराज देसाईंना इतक्या भरघोस मताधिक्क्याने विजयी करा की, विरोधकांचे पुन्हा आमदारकी लढविण्याचे धाडस झाले नाही पाहीजे.

आपली प्रतिक्रिया द्या