कळंब तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याची भीती

1019

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून मागील 24 तासात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता संसंर्ग पाहता कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कळंब तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून दररोज कोरोनाच्या रुग्णामधे मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तालुक्यातील भाटशिरपुरा येथील 65 वर्षीय व्यक्ती बार्शी येथे दवाखान्यात तपासणीसाठी जात होते. श्वासोच्छवासाचा त्रास होवू लागल्याने त्यांना धाराशिव येथील कोविड सेंटर मधे अॅडमिट केले असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सदरील रुग्णास त्रास होऊ लागल्याने सोलापुर येथे नेले असता आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यु झाला. बोर्डा येथील एका वयोवृद्ध व्यक्तीला कळंब येथील कोविड सेंटरमधे रविवारी दाखल करून स्वॅब घेतले असता सदरील रुग्ण पॉझिटिव्ह आला त्याला जास्त त्रास जाणवत असल्याने धाराशिव येथे उपचारासाठी पाठवले असता त्याचा रात्री मृत्यु झाला तसेच कळंब शहरातील दत्त नगर मधिल 48 वर्षीय पुरुषाला खोकल्याचा त्रास जाणवु लागल्याने येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी करून स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला त्याला त्रास जाणवु लागल्याने धाराशिव येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचार चालु असतानाच रात्री त्याचा मृत्यु झाला. एकाच दिवसात तालुक्यात तिन जणांचा कोरोनाने मृत्यु झाल्याने मोठी खळबळ माजली असून जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कम्युनिटी प्रेडमुळे तालुक्यात गुरुवारी 55 तर शुक्रवारी 26 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असुन कळंब येथील आयटीआय कोविड सेंटर मधे सध्या तालुक्यातील 105 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू असुन क्लोज काँटॅक्टमधील 72 जणांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे व डॉ. स्वप्नील शिंदे यांनी दिली.

खासदार आमदारांनी दिल्या कोरोना हॉटस्पॉट भागाला भेटी
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कळंब तालुक्यातील कोथळा, ढोराळा, लोहटा (पुर्व), ईटकुर, बोरगाव (ध), कन्हेरवाडी, रत्नापुर या गावी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे – पाटील, जि. प. सदस्य बालाजी जाधवर यांनी भेटी देवुन अर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप करण्यात आले. कुणीही घाबरून जावु नये, लक्षण जाणवल्यास समोर येवुन तपासणी करण्याचे आवाहन केले तसेच आरोग्य विभागाला संपर्कातील व्यक्तीच्या स्वॅब घेण्याचे आदेश दिले. यावेळी नितिन भोसले, प्रदिप मेटे, भारत सांगळे, आश्रुबा बीक्कड, सचिन काळे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या