कळंब- दहा दिवस उपचार करून घरी निघालेले रुग्ण निघाले पॉझिटिव्ह

1030

आयसीएमआरच्या नविन नियमावलीच्या धोरणाचा फटका कळंब उपजिल्हा रुग्णालयाबरोबरच पाथर्डी गावातील कोरोनाबाधित महिलेला बसला आहे. केंद्राच्या सूचनांनुसार दहा दिवस उपचार पूर्ण झाल्याने रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

कळंब तालुक्यात दहा दिवसांपूर्वी पाथर्डी पती-पत्नीचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रुग्ण दाखल करून दहा दिवस झाल्याने रूग्णालय प्रशासनाने केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनांचा हवाला देत रुग्णांच्या अंगावरती फुले उधळत शुक्रवारी डिस्चार्ज दिला. परंतु यातील पत्नीचा अहवाल रात्री उशीरा पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनामधे व जनतेत एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य सचिवांनी केंद्राचा हवाला देत बाधित रुग्णांना कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता सोडण्यात यावे. रुग्णांना ताप, सर्दी, खोकला असेल तरच त्याची तपासणी करावी, असे आदेश दिल्याने त्यानुसार रुग्णांना घरी सोडल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले. या नियमांचे पालन करताना राज्यात दुसऱ्या ठिकाणीही असाच प्रकार घडु शकतो. यामुळे या नियमावर वेळीच निर्बंध न घातल्यास राज्यात गोंधळ उडु शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे मात्र रात्री उशिरा आलेल्या अहवालात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याने जिल्यात एकच खळबळ माजली आहे

कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पाथर्डी येथील पती-पत्नीचा देखील समावेश होता. त्यांच्यावर कळंब रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन दोन चाचणी घेण्यात आल्यानंतर गुरुवारी तिसऱ्या चाचणीसाठी पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. पण, दोन चाचण्याचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे पाहून तिसऱ्या चाचणीचा अहवाल येण्याआधीच दहाव्या दिवशी हे दांपत्य रोगमुक्त झाल्याची घोषणा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली. या दांपत्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. एवढेच नाही तर रुग्ण बरे झाले या आनंदाने त्याच्या वर रुग्णालयातुन बाहेर पडताना त्यांच्यावर फुले देखील उधळली. मात्र, आता त्यातील महिलेच्या कोविड-19 चाचणीचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला. हे नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात आले होते. दरम्यान, रुग्णाची प्रकृती ठीक आहे. राज्यशासनाकडून नवीन मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसारच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान राज्य शासनाने काही नवीन सूचना दिल्या आहेत. त्यात बदल देखील करणे गरजेचे आहे. अन्यथा असे गोंधळ उडत राहतील.

नियम काय सांगतो व सूचना काय आहेत
कोरोनाबाधित रुग्णाच्या सलग तीन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला सुटी दिली जात होती. मात्र, आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णाची कुठलीही चाचणी न करता थेट दहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे. सुटी देण्यात आलेल्या रुग्णाला आता १14 ऐवजी सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. कोरोनाविषयी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाच्या संदिग्ध रुग्णाच्या पहिल्या चाचणीनंतर तो पॉझिटिव्ह आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत. यानंतर त्याची पुन्हा चाचणी केली जाणार नाही. दरम्यान, मध्यम लक्षणे असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना दहाव्या दिवशीच चाचणीशिवाय सुटी दिली जाणार आहे; परंतु सुटी देत असताना रुग्णाला सलग तीन दिवस ताप नसावा किंवा ऑक्सिजनची गरज भासू नये, अशी अट आहे. यामुळे गोंधळात भर पडत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या