राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार गायब, पत्नी व मुलाची पोलिसात तक्रार

नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितिन अर्जुन पवार हे गायब झाले आहेत. नितिन पवार यांच्या पत्नी व मुलाने पंचवटी पोलीस स्थानकात ते हरवल्याची व अद्याप घरी परत न आल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा तलाश फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडरवर शेअर केला आहे.

शनिवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये गैरहजर असणाऱ्या आमदारांमध्ये कळवणचे आमदार नितिन पवार यांचेही नाव होते. त्यांच्यासह शहापूरचे आमदार दौलत दरोडा, दिडोरीचे आमदार नरहरी झिरवळ, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील हे देखील या बैठकीला अनुपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती.

भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

दरम्यान, आमदार अनिल पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार आणि बाबासाहेब पाटील यांनी आपण पक्षासोबत आहोत असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. परंतु आता नितिन पवार यांचा पत्ता लागत नाही. त्यामुळे रविवारी सायंकाळी त्यांच्या पत्नी व मुलाने पंचवटी पोलीस स्थानकात ते हरवल्याची व अद्याप घरी परत न आल्याची तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या