कल्याण-डोंबिवलीत ‘कोरोना’चे तीन रुग्ण वाढले, आकडा पोहोचला चोवीस वर

915

कोव्हीड-19 हा व्हायरस दिवसेंदिवस आपले हातपाय झपाट्याने पसरू लागला असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा आता चोवीस वर जाऊन पोहोचला आहे. या तीनही रुग्णांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून वाढत चाललेली संख्या लक्षात घेतात नागरिकांनी लॉक डाऊन चे नियम गांभीर्याने पाळावेत असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

आज नव्याने आढळून आलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण डोंबिवलीच्या गरीबाचा वाडा येथे राहणारा असून तो 41 वर्षांचा आहे .दरम्यान हा रुग्ण राहत असलेल्या परिसराला सील ठोकण्यात आले असून अन्य दोन रुग्ण कल्याण च्या चिकणघर मधील आहेत. त्यात एका साठ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. याच भागातील सहा महिन्याच्या बालकाला देखील तरुणाची लागण झाली आहे .

पाच जणांना डिस्चार्ज
डोंबिवली शहरातील लग्‍न समारंभात गेलेली साठ वर्षीय कोरोना बाधित महिला उपचारांती पुर्णपणे बरी झाली असून तिला डिसचार्जही देण्‍यात आला आहे. त्‍यामुळे महापालिका क्षेत्रातील डिसचार्ज दिलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या आता 5 झाली आहे.

19 जणांवर उपचार सुरू

कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकूण 19 कोरोनाबाधित नागरिक रूग्‍णालयात उपचार घेत आहेत. कल्‍याण महापालिकेमार्फत शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय हे विलगीकरण रूग्‍णालय म्‍हणून घोषित केले असून महापालिका क्षेत्रातील संशयित रूग्‍णांना तेथे दाखल करून घेण्‍यात येणार आहे.

खाजगी डॉक्टरांना मदतीचे आवाहन
‘कोरीना’ शी दोन हात करण्यासाठी सुरू झालेल्या युद्धात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी डॉक्टर्स, नर्सेस तसेच वॉर्डबॉय यांनी मदत करावी असे कळकळीचे आवाहन आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आज व्हिडिओच्या माध्यमातून केले. डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग या संकटसमयी करावा. त्यांना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पुरवण्यात येतील तसेच त्यांना जेवण ,घरून आणण्याची व नेण्याची देखील व्यवस्था करू असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. खाजगी डॉक्टरांनी आपली सेवा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला द्यावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या