कोरोना क्राईम; बोगस ई पास रुपये 5 हजार कल्याणमध्ये टोळीचा पर्दाफाश

680
crime

लॉकडाऊन असल्याने बाहेर गावी जाण्यासाठी पोलिसांचा ई पास बंधनकारक केला आहे. मात्र आता बनावट ई पास तयार करणाऱ्या टोळीचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पालिकेच्या प्रभागक्षेत्र अधिकाऱ्याच्या ना हरकत दाखल्यावरील नाव पत्ते बदलत तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रावर फेरफार करत बनावट ई पास तयार करणाऱ्या सायबर कॅफे मालक प्रमोद भुजबळ आणि कुमार पवार यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमधील रविचंद वाघारी यांनी गुजरातमधील मूळ गावी जाण्यासाठी ई पास मिळवून देण्यासाठी प्रमोद भुजबळ यांच्या सायबर कॅफेत चौकशी केली असता तेथील कामगार कुमार पवार याने ४ माणसाच्या ई पाससाठी पाच हजार खर्च येईल असे सांगितले. यानंतर भुजबळ आणि पवार यांनी ब प्रभाग क्षेत्र अधिकार्याचा ना हरकत दाखल्याच्या मूळ प्रतीत फेरफार करत तसेच पालिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात खाडाखोड करत बनावट कागदपत्र तयार केली. पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर साथरोग नियत्रण कायद्याचा भंग केल्याचा ठपका ठेवत उप निरीक्षक अजिंक्य धोंडे यांनी पवार आणि भुजबळ यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान या दोघांनी अशा प्रकारे किती जणांना बनावट पास दिला याची चौकशी सुरू आहे.

बॉक्स मोबाईल शॉपी फोडली

लॉकडाऊन आणि संचारबंदीचीctime कडक अंमलबजावणी सुरू असतानाही कल्याण डोंबिवलीत चोरीच्या घटना घडतच आहेत. आज तर कल्याणमधील गजबजलेल्या ठिकाणी मोबाईल शॉपी फोडण्यात आली. स्टेशन परिसरातील महालक्ष्मी हॉटेल जवळील स्वस्तिक टेलिकॉम हे दुकान फोडण्यात आले. लाखो रुपये किमतीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या