Video – भरधाव एक्सप्रेसमोर तरुणाने घेतली उडी, सीसीटीव्हीमध्ये थरार कैद

कल्याणजवळील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर बुधवारी एका तरुणाने भरधाव एक्सप्रेसपुढे उडी घेतली. यावेळी ड्यूटीवर तैनात असणाऱ्या ऋषिकेश माने नावाच्या रेल्वे पोलिसाने जीव धोक्यात घालून तरुणाला रेल्वे रुळावरून बाजूला केले आणि त्याचा जीव वाचवला. कुमार पुजारी असे उडी घेणाऱ्या तरुणाचे नाव असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.