कल्याणमध्ये भलतेच, येशूचा धावा करा कोरोना बरा होईल

1012

बायबलचे पारायण करा, येशूचा धावा करा कोरोना बरा होईल असा सल्ला देणाऱ्या आरोग्य परिचारिका विरोधात कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल झाली आहे. कल्याण पूर्व येथील नेतीवली आरोग्य उप केंद्रात दाखल रुग्णांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या प्रकाराने कल्याणकर हादरले आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वत्र खबरदारी आणि उपाययोजना बाबतीत शासन गंभीर पावले उचलत असतांना कल्याणमध्ये बायबल पुराण घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. नेतीवली उपकेंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना येथील आरोग्य परिचारिका मीनाक्षी अवस्थी अनाहूत सल्ले देत असल्याचे उघड झाले आहे. गुप्ता नामक एका रुग्णाला अवस्थी यांनी औषधे घेण्यापेक्षा येशूचा धावा करा, बायबल वाचा सर्व रोग बरे होतील. इतकेच काय कोरोना सुद्धा जवळ येणार नाही असे म्हणत अकलेचे तारे तोडले. यामुळे अवाक झालेल्या गुप्ता यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार अर्ज दिला आहे. शिवाय पोलिसांतही तक्रार दिली आहे. पोलीस अर्जाची चौकशी करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे

आपली प्रतिक्रिया द्या