सुरेश टावरे, बाबाजी पाटील यांचे कार्यालय बेकायदा इमारतीत

22

सामना ऑनलाईन। कल्याण

कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना हक्काच्या जनसंपर्क कार्यालयासाठी जागा मिळतानाही नाकीनऊ आले आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावताच कल्याणचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना अंबरनाथमधील बेकायदा कार्यालयाला टाळे ठोकावे लागले. तर भिवंडीचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टाकरे यांनीही कल्याणच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतच कार्यालय उघडल्याचे उघड झाले आहे.

अंबरनाथच्या हुतात्मा चौकातील एका अनधिकृत गाळ्यामध्ये कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी निवडणूक कार्यालय थाटले होते. मात्र निवडणूक आयोगाने त्यांना चांगलाच दणका दिला. बाबाजी पाटील यांच्या प्रचार कार्यालयासाठी कागदपत्रांची कोणतीही पूर्तता केली नाही. तसेच नगर परिषदेकडून देण्यात येणारा ना हरकत दाखलाही त्यांनी सादर केला नसल्याने हे कार्यालय बंद केल्याचे निवडणूक नियंत्रक कक्ष अधिकारी सलोनी निककर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे एकीकडे हसे झाले असताना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदकार सुरेश टाकरे यांनी तर कहरच केला. कल्याणच्या शिकाजी चौकात बांधकाम सुरू असलेल्या एका अर्धवट इमारतीतच जनसपंर्क कार्यालय थाटले आहे. पालिकेची ओसी नसतानाही बेकायदा कार्यालय थाटल्याने त्यांना हे कार्यालय तत्काळ बंद करावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या