कल्याण, ठाणे, लोकमान्य टिळक स्थानकात झटपट आरोग्य चाचण्या होणार!

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांच्या आरोग्य तपासण्या करण्यासाठी ‘हेल्थ एटीएम’ बसविण्यासाठी टेंडर मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर हेल्थ एटीएम बसविण्यात येणार असून अवघ्या 15 मिनिटांत 16 आरोग्य चाचण्या करता येणार आहेत.

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी अभिनव अशा ‘हेल्थ एटीएम’ची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुण्याच्या मे. हेल्थ एटीएम इंडिया प्रा.लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यांत ‘योलो हेल्थ एटीएम किऑस्क’ रेल्वे स्थानकांवर लागणार आहे. यात 50 ते 100 रुपयांत आरोग्य चाचण्या करता येतील. त्याचे निदानही झटपट होणार असून प्रवाशांना प्रिंटआऊट, ई-मेल तसेच मोबाईल एसएमएसने रक्तचाचण्यांसह इतर 17 चाचण्यांचे अहवाल प्राप्त होतील अशी योजना आहे.

या चाचण्या होणार

‘बीएमआय’ ब्लडप्रेशर, पल्सरेट, फॅट, मसल ऍण्ड बोन मास अशा 16 तपासण्या 50 रुपयांत होतील तर रक्तचाचणी, ब्लडशुगर चाचण्या 100 रुपयांत होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. मध्य रेल्वे कंपनीला रेल्वे स्थानकांवर 8×6 फुटांची जागा देणार असून कंपनी त्यासाठी रेल्वेला वार्षिक तीन लाख 60 हजार रुपये भाडे देणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या