एकेकाळी ‘शेक हँड’साठी नकार देणाऱ्या कमल हसनची रजनीकांत यांना एकीची साद

1055

तमीळनाडू विधानसभा निवडणूक 2021 मध्ये होणार आहे. या अनुषंगाने राज्यात नवीन राजकीय समिकरणं पाहता येईल अशी शक्यता आहे. चित्रपट नगरीतून आलेले दिग्गज अभिनेते कलम हसन आणि सुपरस्टार रजनीकांत दोघेही एकत्र सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. कमल हसन यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘आघाडी’चे संकेतही दिले आहेत.

कलम हसन यांचा मक्‍कल निधि मायम हा पत्र निवडणूक लढला आहे, मात्र रजनीकांत यांचा पक्ष अजून सक्रीय राजकारणात उतरलेला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन भिन्न विचारधारा असणारे पक्ष आणि एकमेकांशी शेक हँड करण्यासही नकार देणारे हे दोन नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. याचे संकेत दोन्ही नेत्यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या वक्तव्यातून दिसून येतात.

‘रजनीकांत माझा जुना मित्र आहे. आमची मैत्री 44 वर्षे जुनी आहे. जर आवश्यकता असेल तर तमीळनाडूच्या विकासासाठी आम्ही दोघेही एकत्र येऊ’, असे कलम हसन म्हणाले. कमल हसन यांच्या या विधानानंतर रजनीकात यांनी देखील ‘आम्ही एकत्र येण्याने जनतेचा फायदा होणार असेल तर कमल हसनसोबत आघाडी करण्यासही मागेपुढे पाहणार नाही’, असे विधान केले.

जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनामुळे तमीळनाडूच्या राजकारणात सध्या पोकळी निर्माण झाली आहे. याच दरम्यान कमल हसन आणि रजनीकांत यांनी आपाला पक्ष स्थापन केल्याने दोघांकडूनही जनतेला अपेक्षा आहेत. कमल हसन यांनी निवडणूक लढवली मात्र अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. तरीही हे दोन दिग्गज एकत्र आल्यास काहीतरी नवीन घडेल अशी नागरिकांना आशा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या