कमल हसन राजकारणात; नव्या पक्षाची लवकरच घोषणा

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अभिनेते कमल हसन लवकरच राजकारणात उतरणार असून त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत मिळत होते, मात्र ते इतर कोणत्या पक्षात जाणार किंवा स्वत:चा पक्ष स्थापन करणार याबाबत उत्सुकता होती.

गेल्या काही महिन्यांपासून रजनीकांत आणि कमल हसन यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा रंगली होती. आता कमल हसन नवा पक्ष स्थापन करणार आहेत तर रजनीकांत यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. एका मुलाखतीदरम्यान आपली राजकीय भूमिका आणि विचार जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच विकासाची सुरुवात करण्यासाठी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे कमल हसन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या