कमला हॅरिस यांना 28 तासांत बहुमत, डेमोव्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित

हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांना डेमोव्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या निवडणुकीच्या 28 तासांत त्यांना पक्षाच्या 2350 हून अधिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. कमला हॅरिस यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. 6 ऑगस्टला मतदान संपल्यानंतरच राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांची अधिकृत घोषणा केली जाईल. त्यानंतर त्यांचा थेट सामना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होईल. कमला या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. पक्षाने मला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, हा माझा सन्मान आहे. मी अधिपृतपणे पुढील आठवड्यात नामांकन स्वीकारेन, असे कमला हॅरिस यांनी शुक्रवारी बहुमत मिळाल्यानंतर म्हटले. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. दोन महिन्यांनंतर म्हणजेच 6 जानेवारी 2025 ला निकाल जाहीर केले जातील.

आम्ही निवडणूक नक्कीच जिंकू

कमला हॅरिस यांना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष बनवणे हा माझा आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. आता कमला आमच्या पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्या आहेत. मला खूप अभिमान आहे. आगामी निवडणूक आम्ही नक्कीच जिंकू, असे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले.

पोलमध्ये कोण पुढे, कोण मागे

जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आणि कमला हॅरिस यांना उमेदवारीसाठी पुढे केल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाला फायदा झाला आहे. कमला हॅरिस या किमान 4 पोलमध्ये ट्रम्प यांच्यावर आघाडीवर आहेत. बहुतेक सर्वेक्षणांमध्ये ट्रम्प अजूनही पुढे आहेत. जवळपास 8 लमध्ये ट्रम्प हे आघाडीवर आहेत, परंतु येथे हॅरिस आणि ट्रम्प यांच्यातील फरक कमी झाला.