सात मिनिटांत मी मृत्यूला अनुभवले

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुलभा अरोरा यांनी गुरुवारी रात्री वन अबाव्ह रेस्टॉरंटमध्ये मृत्यूला हुलकावणी दिली. डॉ. अरोरा या त्यांच्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. सवाबाराच्या सुमारास अचानक वन अबाव्हमध्ये आग लागली. सुरुवातीला आग छोटी होती. त्यामुळे त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. पण इथेच घात झाला.

आगीने क्षणाधार्थ रौद्ररूप धारण केले. बघता बघता आग झपाट्य़ाने पसरली. सर्वत्र धूर पसरला. जो तो जीव मुठीत घेऊन सैरावैरा धावत सुटला. रेस्टॉरंटमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थती निर्माण झाली. बाहेर कसे पळायचे हेच समजत नव्हते. आता आपलेदेखील काही खरे नाही असे मनात वाटू लागले. पण तेवढय़ात तेथील एका कर्मचाऱ्याने किचनच्या मागच्या बाजूला असलेल्या दरवाजातून आम्हाला बाहेर काढले आणि माझी मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली. ती सात मिनिटे मी मृत्यूला अनुभवल असे सांगताना डॉ. सुलभा अरोरा पुरत्या हादरून गेल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या