कामासूत्रा 3D चित्रपटाच्या अभिनेत्रीचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील हॉट चित्रपट कामासूत्रा 3D या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीचा हदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला आहे. सायरा खान असे त्या अभिनेत्रीचे नाव असून ती फक्त 26 वर्षांची होती. चित्रपटाचे दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी तिच्या निधनाची माहिती दिली.

saira-khan-1

‘सायराच्या निधनाचे वृत्त ऐकून प्रचंड धक्का बसला. ती एक गुणी अभिनेत्री होती. तिने कामासूत्रा चित्रपटात अप्रतिम काम केले होते. मात्र तिच्या कामाची कुणीच दखल घेतली नाही. हे दुख तिला सतावत होतं. तिच्या सारख्या अभिनेत्रील बॉलिवूडमधील चांगले चांगले चित्रपट करता आले असते’, असे रुपेश पॉल यांनी सांगितले.

कामासूत्रा चित्रपटासाठी सुरुवातीला शर्लीन चोप्राला घेण्यात आले होते. मात्र नंतर तिच्या जागी सायराला घेण्यात आले होते. मात्र सायरा ही एका मुस्लीम कुटुंबातील मुलगी असल्याने पहिल्याच चित्रपटात बोल्ड सिन देण्यास ती तयार नव्हती. मात्र तब्बर दोन तीन महिने तिची मनधरणी केल्यानंतर सायरा यांनी रुपेशला चित्रपटासाठी होकार कळवला होता.