कंगनाचे बांधकाम बेकायदा, दोन कोटींचा दावाही बोगस!

अभिनेत्री कंगना राणावतने पाली हिल येथील बंगल्यात केलेले बांधकाम हे बेकायदेशीर असल्यानेच त्यावर कारवाई करण्यात आली त्यामुळे तिने नुकसान भरपाईपोटी पालिकेकडे केलेला दोन कोटींचा दावाही बोगस आणि निराधार असल्याचा युक्तिवाद पालिका प्रशासनाने केला आहे तसे प्रतिज्ञापत्रच पालिकेने हायकोर्टात शुक्रवारी दाखल केले.

पालिकेची ही कारवाईच बेकायदा असल्याचा कांगावा करत कंगनाने हायकोर्टात पालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात पालिकेचे एच पश्चिम प्रभागाचे अधिकारी भाग्यवंत लते यांच्या वतीने ऍड.जोएल कार्लेस यांच्या मार्फत आज प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की पालिकेने नियमानुसार कारवाई केली असून या कारवाईत झालेल्या नुकसानीला पालिका जबाबदार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या