मी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही!कंगनाचा हायकोर्टात दावा

रितसर परवानगी न घेता बंगल्यात बेकायदा बांधकाम केल्याचा पालिकेचा आरोप खोटा असून मी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही असा दावा अभिनेत्री कंगना राणावत हिने हायकोर्टात केला आहे.कंगना राणावतने पाली हिल येथील बंगल्यात केलेले बांधकाम हे बेकायदेशीर असल्यानेच त्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई आकसापोटी करण्यात आली असून नुकसानभरपाई म्हणून पालिकेने दोन कोटी द्यावे अशी मागणी करत कंगनाने काही दिवसांपूर्वी हायकोर्टात याचिका केली होती. कंगनाची दोन कोटीची मागणी फेटाळून लावत पालिकेने कारवाई योग्यच असल्याचा दावा हायकोर्टात केला होता. पालिकेच्या या दाव्याविरोधात कंगनाने सोमवारी पुरवणी अर्ज  दाखल केला. त्यात तिने असे म्हटले आहे की महापालिका जाणीवपूर्वक माझ्याविरोधात कारवाई करीत आहे. मी नियमांचे उल्लंघन केले नाही. फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रालाही महापालिकेने बेकायदा बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली. मात्र त्याला सात दिवसांचा अवधी देण्यात आला; परंतु माझ्याबाबतीत असे न करता २४ तासात कारवाई करण्यात आली. हा अर्ज दाखल करून घेत हायकोर्टाने सुनावणी उद्या मंगळवारपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या