कंगनाची तलवारबाजी पाहिली का?

सामना ऑनलाईन, मुंबई

काही दिवसांपुर्वी ‘मणिकर्णिकाः क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेत्री कंगना रनौत तलवारबाजी करत असताना जखमी झाली होती. तिच्या कपाळावर खोल जखम झाली होती. आता कंगना त्या अपघातातून सावरली असून तिने पुन्हा तलवारबाजीचा सराव सुरू केला आहे. तिचा तलवारबाजीचा सराव करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कंगना एका लढवय्यासारखी तलवारबाजी करताना दिसत आहे. या चित्रपटासाठी ती हॉलिवूडचा स्टंट डायरेक्टर निक पॉवेल यांच्याकडून तलवारबाजी शिकत आहे.

‘मणिकर्णिकाः क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारत आहे. सध्या वाराणसीत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. एप्रिल महिन्यात या चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या