तेजस – कंगणाचा डॅशिंग लूक, पोस्टरवरून चित्रपटाची उत्सुकता वाढली

697
tejas-kangana

बॉलीवूडमध्ये आपल्या बिनधास्त, बोल्ड भूमिकेतून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी कंगणा रनौत ही आता नव्या रुपात दिसणार आहे. कंगणाचा नवीन चित्रपट ‘तेजस’चं पोस्टर चित्रपट दिग्दर्शकांनी आज लाँच केले आहे. यामध्ये कंगणा ही हवाई दलाच्या महिला वैमानिकाच्या रुपात पाहायला मिळत असून डॅशिंग लूक असलेले हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणभूमीवरील धावपट्टीवर उभे असलेले लढाऊ विमान, धुळीचे लोट, आणि डोळ्यावर काळा गॉगल असलेली ऐटीत चालणारी महिला पायलट म्हणजेच कंगना असे या पोस्टरमध्ये दिसत आहे. सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित तसेच रॉनी स्क्रूवालाच्या ‘आरएसव्हीपी’मधून ‘तेजस’ चित्रपट लवकरच पडद्यावर झळकणार आहे.

आम्ही लष्करावर आधारित उरी द सर्जिकल स्ट्राईक नावाचा चित्रपट आणला होता. त्यानंतर आता आम्ही देशातील हवाई दलातील महान वैमानिकांची कहाणी समोर आणणार आहोत, त्यांनी देशाला पहिलं स्थान दिलं आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना कंगणा म्हणाली की अशा देशाच्या लष्करात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केलं आहे. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. या चित्रपटात देशाला प्रथम स्थान देणाऱ्या लढाऊ महिला वैमानिकाची भूमिका मी साकारत आहे. तेजस चित्रपटातून देशभक्ती पोहोचवू आणि देशातील तरुणांपर्यंत अभिमान वाटावी असा हा चित्रपट असेल, अशी आशा तिने व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या