बिग बॉसच्या मंचावर कंगनाने घेतला दबंग सलमान खानशी ‘पंगा’

2923

आपल्या बेधडक विधानांनी आणि रोखठोक वागण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडचा डान्सिंग सुपरस्टार ऋतिक रोशन याला भिडणाऱ्या कंगनाने बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावत आता थेट ‘दबंग’ सलमान खान याच्याशी पंगा घेतला आहे. दोघांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळाली.

कंगना रणौत हिने सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी तिने सलमान खानशी पंगा घेतला. मात्र हा खराखुरा पंगा नाही तर आगामी सिनेमा पंगाच्या प्रमोशनसाठी ती येथे आली होती. यावेळी या दोघांनी काही मजेशीर टास्क सुद्धा केले. यातील एक टास्क होता एंटरटेनमेंट पंगा.

salman-kangana

या टास्कमध्ये कंगना सलमानला म्हणते, या घरातले सदस्य नेहमीच एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलतात. मग आज मी तुझ्यासाठी सुद्धा तसाच एक टास्क आणला आहे. ज्यात आपण आपल्या सिनेमांचे काही डायलॉग असेच बोलायचे आहेत. कंगनाचे बोलणं पूर्ण होण्याआधीच सलमान त्याचा बॉडीगार्ड सिनेमातील ‘मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान नहीं करना हा डायलॉग ओरडून ओरडून बोलताना दिसतो.

सलमान म्हणतो… माझ्या पाच गर्लफ्रेंड झाल्या पण मी आजही वर्जिनच

सलमानच्या या अवतारामुळे कंगना घाबरते. सलमानच्या या अवतारावर कंगनासुद्धा त्याला तसेच उत्तर देते. ती म्हणते ‘मेरा सेन्स ऑफ ह्यूमर बहुत अच्छा है ये आपको धीरे धीरे पता चलेगा’, हा डायलॉग बोलताना दिसते. नंतर सलमान सुद्धा ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद मैं खुद की भी नहीं सुनता, अब मैं खुद की मिमिक्री कर रहा हूं’, असे बोलतो आणि मग दोघेही हसू लागतात.

आपली प्रतिक्रिया द्या