कंगनाला पटविण्यासाठी हृतिक मला इम्प्रेस करत होता, रंगोलीचा दावा

कंगना व हृतिक रोशन यांच्यातील वाद क्षमत आल्याचे वाटत असतानाच कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने पुन्हा एकदा या वादात तेल ओतले आहे. रंगोलीने पुन्हा एकदा ट्विटरवरून हृतिकवर निशाणा साधला आहे. कंगनाला इम्प्रेस करण्यासाठी हृतिक रोशन रंगोलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा असा दावा तिने या ट्विट मधून केला आहे. तिने या ट्विटमध्ये हृतिकला पप्पू देखील म्हटले आहे.

‘हे बघा पप्पूजी, पूर्ण दिवस मला इम्प्रेस करायच्या प्रयत्नात असायचा जेणेकरून तो माझ्या बहिणीच्या नजरेत चांगला बनू शकेल. आणि आज तो आम्हालाच बोलतो की ‘हम आपके है कौन?’ असे ट्विट रंगोलीने केले आहे. एका ट्विटर युजरने रंगोली व कंगना हृतिकचा मानसिक छळ करत असल्याचा दावा केल्यानंतर रंगोलीने त्याला फटकारत हे ट्विट केले आहे. त्य़ा य़ुजरने कंगनाने हृतिकची माफी मागितली का असा सवाल देखील केला आहे. त्यावर उत्तर देताना रंगोली म्हणाली? ‘कंगनाच्या मागे वेडा झालेल्या व्यक्तीबद्दल ती का चौकशी करेल. तो व्यक्ती तिच्या मागे वेडा आहे पण बायकोलाही सोडू शकत नाही. कारण तो अजुनही त्याच्या वडिलांच्या पैशावर जगतो. कंगनाकडे सध्या खूप प्रॉपर्टीज आहेत. आणि त्याने अद्याप स्वत:चे घर देखील खरेदी केलेले नाही. नेपोटिझमचे प्रोडक्ट आहे हा पप्पू. त्याची चौकशी काय करायची?’

रंगोली व कंगनाचे बॉलिवूडमध्ये अनेकांशी वाद झाले आहेत. त्यांनी करन जोहर, महेश भट्ट, आलिय भट्ट, रणबीर कपूर , जावेद अख्तर यांना देखील नेपोटिझम वरून फटकारले आहे. काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावले असल्याचा दावा देखील रंगोलीने केला होता.

कंगनाला गुरु मान, रंगोलीचा हृतिकला सल्ला 

हृतिक रोशनचा ‘सुपर-30’ हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी रंगोली हिने हृतिकच्या अभिनयावर निशाणा साधताना त्याला कंगनाकडून अॅक्टिंग शिकण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्याने 90 च्या दशकाप्रमाणे तोंडावर काळे फासून अभिनय केल्याची टीकाही रंगोलीने लागोपाठ ट्वीट करून केली आहे. रंगोली ट्विटरवर म्हणाली की, 90 च्या दशकाप्रमाणे तोंडावर काळे फासून अभिनय करून ऋतिक रोशनने एका महान व्यक्तीची बायोपिक खराब केली. सगळे लक्ष कंगनाकडे ठेवल्यावर अभिनय कधी करणार? तिला गुरू मान, रोज तिच्या फोटोची पुजा कर आणि तिच्याकडू थोडा अभिनय शिक, असा सल्लाही तिने दिला.

आपली प्रतिक्रिया द्या