देश काँग्रेसमुक्त की भाजप काँग्रेसयुक्त – कन्हैयाकुमार

37

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

देश काँग्रेसमुक्त करू पाहणारे नरेंद्र मोदी हे भाजपलाच काँग्रेसयुक्त करू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसमुक्त हिंदुस्थान की काँग्रेसयुक्त भाजपा असा नवीन प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणी केली. नोटाबंदीमुळे उद्योग क्षेत्रात कंपन्या बंद पडून १५ लाख लोकांचा रोजगार बुडाला. पण नरेंद्र मोदी सरकार देशात १५ लाख बेरोजगारांना रोजगार दिल्याचा दावा करतात, हा चक्क खोटारडेपणाच आहे, असा आरोप जेएनयुचा युवा नेता कन्हैयाकुमार यांनी केला.

तापडीया नाट्यमंदिरात कन्हैयाकुमार यांनी लिहिलेल्या आत्मचरित्ररुपी पुस्तकाचेसुधाकर शेंगडे यांनी केलेल्या अनुवादित बिहार ते तिहार या पुस्तकाचे विमोचन करताना ते बोलत होते. कन्हैयाकुमार म्हणाला, मी साहित्यिक नाही मात्र माझ्यावर झालेले आरोप आणि त्यानिमित्ताने झालेला अपप्रचार किती खोटा आहे हे प्रत्येक वेळी सांगत बसण्यापेक्षा पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या