नायजेरियात तिहेरी आत्मघाती बॉम्बस्फोट; 30 ठार

सामना ऑनलाईन। कानो

ईशान्य नायजेरियात रविवारी रात्री दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या तिहेरी आत्मघाती बॉम्बस्फोटात 30 जण ठार झाले असून 40 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हे बॉम्बस्फोट बोको हराम जिहादी गटाने केल्याचा अंदाज आहे.

बोर्नो राज्याची राजधानी मैदुगुरी शहरातील कोंडुगा हॉलबाहेर दहशतवाद्यांनी रात्री 9 च्या दरम्यान स्फोट घडवून आणले. हॉलमध्ये फूटबॉलप्रेमी टीव्हीवर सामना पाहात असताना हे स्फोट झाले. हॉलच्या मालकाने एका सुसाईड बॉम्बरला आतमध्ये जाताना रोखले. तर इतर दोन सुसाईड बॉम्बर चहा स्टॉलच्या गर्दीत घुसले आणि त्यांनी स्वत:ला उडवून दिले.