कानपूर पोलीस हत्याकांड, गँगस्टर विकासला टीप देणारे तिघे पोलीस निलंबित

809

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात आठ पोलिसांची गोळीबारात हत्या करणाऱया गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यापूर्वीच त्याची बातमी फुटली होती, त्यामुळेच पोलीसांचा हकनाक बळी गेल्याचे उघडकीस आले आहे. कानपूर जिल्ह्याच्या चौबेपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच याची त्याला पक्की खबर देण्यात आली होती. पोलीस पथकातील अनेक पोलीस त्याला सामील होते असे उघड झाल्याने सोमवारी एसएसपीने दोन उपनिरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलला या प्रकरणात सस्पेन्ड केले आहे.

नामचीन गुंड असलेल्या विकास याच्यावरील पोलिसांच्या कारवाईपूर्वी याची बातमी फुटली होती. त्यामुळेच पोलिसांचा बळी गेला. या प्रकरणात चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय तिवारी यांना यापूर्वीच सस्पेंड करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या प्राथमिक तपासात हलगर्जी केल्याने उप निरीक्षक कुंवर सिंह पाल, कृष्ण कुमार शर्मा आणि शिपाई राजीव यांनी निलंबित करण्यात आले. हे तिघे विकास याच्या संपका&त होते असे म्हटले सूत्रांचे म्हणणे आहे.

विकासने घरात 25 ते 30 हत्यारबंद लोकांना जमविले
पोलिसांची टीम आपल्याला अटक करण्यास गावात येणार असल्याची विकासला पूर्ण माहिती होती, यासंदर्भात त्याचा खास हस्तक दयाशंकर अग्निहोत्री यानेच माहिती दिली आहे. रविवारी चकमकीत पकडला गेलेला आणि 25 हजारांचे बक्षीस नावावर असलेल्या दयाशंकर याने कबुली दिली आहे की विकासला पोलीस ठाण्यातून पह्न आला व त्यानंतरच 25 ते 30 जणांना हत्यारासह विकासने घरात बोलावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या