
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ ने यावर्षी सर्वांनाच प्रभावित केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटात ऋषभ एक अनुभवी दिग्दर्शक असण्याबरोबरच एक उत्तम कलाकारही आहे. त्याने या चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून भूमिकाही बजावली आहे. कांताराच्या यशानंतर ऋषभ नव्या उंचीवर पोहचला आहे. त्यातच साउथ सिनेमाचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलाकार रक्षित शेट्टीचा ‘बॅचलर पार्टी’ या चित्रपटातून ऋषभ शेट्टीचा पत्ता कट होवू शकतो.
मागच्या सप्टेंबर मध्ये रक्षित शेट्टीचा ‘बॅचलर पार्टी’ या चित्रपटाची घोषणा झाली. या कॉमेडी चित्रपटात ऋषभ शेट्टी, दिगंत मनचले आणि अच्युत कुमार सारखे कलाकार मुख्य भुमिकेत काम करणार होते. यातच बॅचलर पार्टीचा कलाकार दिगंत मनचलेने यूट्यूबर मधू सुदनला दिलेल्या इंटरव्यू मध्ये सांगितले की रक्षित शेट्टी दिग्दर्शित ‘बॅचलर पार्टी’ या चित्रपटातून ऋषभ शेट्टीला रिप्लेस केलं जावू शकतं.
आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या ऋषभ कांताराच्या यशाचा आनंद घेत आहे. ऋषभने बनवलेला हा चित्रपट साउथ मध्येच नाहीतर संपूर्ण हिंदुस्थानात फेमस झालांय, म्हणूनच आता त्याच लक्ष कांतारा पार्ट 2 कडं आहे. यामुळेच त्याच्या कडे बॅचलर पार्टी या चित्रपटासाठी वेळच नाही आहे, म्हणून तो हा चित्रपट सोडू शकतो.
अवघ्या 15-20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या कांताराने जगभरात 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर हिंदी माध्यमात 80 कोटींचा आकडा पार केला आहे. अशातच ऋषभ आता कांतार 2 बनवण्याच्या तयारीत आहे.