सोमवार विशेष – महादेवाचं एकमेव मंदिर जिथे पिंडीसमोर नंदी नाही

kapaleshwar-temple-nashik

हिंदुस्थानात असं गाव आढळणं मुश्कील आहे जिथं भगवान शंकराचं मंदिर नाही. महादेव, भोलेनाथ, शंकर, शीव अशा विविध नावांनी भगवान शंकराची आराधना संपूर्ण देशात मोठ्या भक्तीभावाने केली जाते. भगवान शंकरची प्राचीन मंदिर देशाच्या काना कोपऱ्यात आढळतात.

प्राचीन मंदिरांमध्ये प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंग तर आहेतच. मात्र असंख्य अशी वैविध्यपूर्ण भगवान शंकराची मंदिरं देखील आहेत. त्याच्या सोबत पौराणिक, ऐतिहासिक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. तर काही ठिकाणी मंदिरांची वास्तू वैशिष्ठ्यपूर्ण आहे.

आज आपण भगवान शंकराच्या अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण मंदिराची माहिती घेणार आहोत.

kapaleshwar-temple-nashik

तीर्थनगरी, पुण्यनगरी नाशिक येथे कपालेश्वर मंदिर हे शंकराचे एकमेव मंदिर आहे जिथे शंकराच्या पिंडीसमोर नंदी नाही. यामागे एक पौराणिक कथा आहे. पुराणात असे सांगीतले आहे की तय काळात ब्रह्मदेवाला 5 मुखे होती. चार मुख वेदांचे उच्चारण करायचे आणि पाचवे मुख निंदा करायचे. या निंदा करणाऱ्या मुखावर भगवान शंकर नाराज झाले. त्यांनी ते मुख धडावेगळे केले. यामुळे लागलेल्या ब्रह्महत्येचे पाप लागले आहे. मिटवण्यासाठी शंकराना सोमेश्वराच्या काठावर एका बछड्याकडुन पापमुक्तिचा उपाय सांगीतला गेला. तो बछडा हा वास्तवात नंदी होता. या नंदिच्या सांगण्यावरून भगवान शंकरानी रामकुंडावर स्नान करून आपले पापक्षालन केले आणि रामकुंडावर शिवलिंगाच्या रूपात वास्तव्य केले. परंतु या नंदिला महादेवाने गुरु मानल्यामुळे त्यानी नंदिला आपल्या मंदिरात समोर स्थापन होण्यास नकार दिला आणि या कारणामुळे शंकराच्या पिंडीसमोर नंदी नसलेले हे कदाचित एकमेव मंदिर आहे.

याशिवाय कपालेश्वर मंदिरासमोर असलेली गोदावरी नदी पार करून प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. येथे प्रत्येक वर्षी हरीहर भेटीचा सोहळा आयोजित केला जातो. कपालेश्वर आणि सुंदर नारायण म्हणजे भगवान विष्णु यांची भेंट घडवली जाते. या एकमेव दिवशी भगवान विष्णु यांना बेलपत्र आणि भगवान शंकर यांना तुळशी पत्र अर्पण केले जाते. हा सोहळाही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हरिहर ऐक्याचा भाव महाराष्ट्रात जसा पंढरपुरात दिसतो तसाच तो नाशिकमध्येही पाहायला मिळतो.

आपली प्रतिक्रिया द्या