भाजप खासदार कपिल पाटील यांच्याआधीच भिवंडीकरांनी फोडला रांजणोली उड्डाणपुलाचा नारळ

1183

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजणोली उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा नारळ आज चक्क दोन वेळा फोडण्यात आला. शासकीय कार्यक्रमानुसार भाजप खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पणाचा घाट उधळत वाहतूककोंडी, आणि वाढत्या अपघातामुळे हैराण झालेल्या भिवंडीकरांनीच सकाळी सर्वात आधी उद्घाटनाचा नारळ फोडला. इतकेच नव्हे तर त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करून उड्डाणपूल खुला झाला असल्याचे जाहीर केले. याची चर्चा भिवंडीत रंगली असतानाच नंतर सायंकाळी नियोजित कार्यक्रमानुसार खासदारांनी उद्घाटनाची औपचारिकता पार पाडली.

मुंबई-नाशिक बायपासकरील महामार्गाकरील भिकंडी-रांजणोली चौकात प्रकाशी काहतूक कोंडीने हैराण होत आहेत. या पार्श्वभूमीकर एमएमआरडीएने भिकंडी तालुक्यातील रांजणोली येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले, मात्र कंत्राटदाराच्या संथगती कारभारामुळे काम केळेत पूर्ण झाले नाही. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उड्डाणपुलाची एक मार्गिका पूर्ण झाली आहे. मात्र बडय़ा राजकीय नेत्याच्या हस्तेच लोकार्पण करण्याचा एमएमआरडीएचा हट्ट असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. आता आचारसंहिता शिथिल होताच सोमवारी सायंकाळी 4 वाजता भाजप खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते रांजणोली उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम एमएमआरडीएने आखला. याची कुणकुण लागताच भिवंडीकरांनी स्थानिक राजकीय प्रतिनिधींच्या सोबत उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा नारळ फोडला. त्यानंतर खासदार कपिल पाटील यांनीही सायंकाळी 4 वाजता शासकीय उद्घाटन केले. मात्र त्याआधीच रांजणोली उड्डणपुलाच्या लोकार्पणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली.

 

आपली प्रतिक्रिया द्या