कपिल, प्राण्यांप्रमाणे माणसांचाही आदर करायला शिक!

27

सामना ऑनलाईन, मुंबई

कॉमेडीकिंग कपिल शर्मा आणि अभिनेता सुनील ग्रोवर यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. कपिलच्या माफीनाम्यानंतर आज सुनील ग्रोवरने मौन सोडले असून ‘प्राण्यांप्रमाणे माणसांचाही आदर करायला शिक’ असा सल्ला सुनीलने कपिलला दिला आहे.

नुकतीच सिडनीहून परतताना दारूच्या नशेत धुंदीत असलेल्या कपिलने सुनील ग्रोवरला मारहाण आणि शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर सुनील खूप दुखावला आहे. सोमवारी फेसबुकवरून कपिल शर्माने त्याची माफी मागून मनधरणी करण्याचा प्रयत्नदेखील केला. यासंदर्भाप सुनीलने ट्विटरवर पोस्ट लिहिली असून त्यातून त्याची नाराजी स्पष्ट होतेय. पोस्टमध्ये सुनील लिहितो की, ‘भाईजी तू मला फारच दुखावले आहेस. तुझ्यासोबत काम करताना मला खूप काही शिकता आले. पण तुला एकच सल्ला देतो, प्राण्यांप्रमाणे माणसांचाही आदर करायला शिक. सगळेच तुझ्यासारखे टॅलेंटेड नाहीत. सगळेच तुझ्याएवढे टॅलेंटेड झाले तर तुझी कदर कोण करेल ?’

त्याच्या या पोस्टवरूनच त्याची नाराजी स्पष्ट होते.

आपली प्रतिक्रिया द्या