कपिल शर्माच्या घरी पाळणा हलला, चिमुरडीचा पहिला फोटो केले शेअर

2150

प्रसिद्ध हास्यकलाकार कपिल शर्मा याच्या घरी पाळणा हलला आहे. कपिल शर्माला मुलगी झाली असून त्याने चिमुरडीचा पहिला फोटो आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. फोटोमध्ये चिमुकली अतिशय गोंडस दिसत असून कपिलच्या चेहऱ्यावरील आनंदही दिसत आहे.

kapil-sharma-girl

कपिल शर्माची पत्नी गिन्नी चथरथ हिने 10 डिसेंबर, 2019 ला मुलीला जन्म दिला. कपिलने 15 जानेवारीला मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

kapil-sharma-1

फोटोमध्ये कपिल आपल्या काळजाच्या तुकड्याला कडेवर घेऊन उभा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये बाप-लेक एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहताना दिसताहेत. कपिलने मुलीचे नाव ‘अनार्या शर्मा’ (Anayra Sharma) असे ठेवले आहेत. दरम्यान, कपिलने शेअर केलेले हे फोटो सध्या व्हायरल होत असून कपिलला चाहत्यांकडून शुभेच्छाही मिळत आहेत.

कपिल शर्मा आणि गिन्नी शर्मा यांचे अमृतसर येथे 12 डिसेंबर, 2018 ला लग्न झाले होते. दोघांच्या लग्नाची त्यावेळी चांगलीच चर्चाही झाली होती. या लग्नाला टीव्ही, बॉलिवूड आणि पंजाबी इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

kapil

लग्नानंतर पत्नी गर्भवती असताना कपिलने एका मुलाखतीमध्ये मी फक्त पत्नीची काळजी घेऊ इच्छितो आणि तिलाच माझा सर्व वेळ देऊ इच्छितो असे म्हटले होते. आम्ही दोघे खूश आहोतच पण माझी आई जास्त खूश आहे असेही तो म्हणाला होता. तसेच आम्हाला मुलगा होईल अथवा मुलगी होईल हे माहीत नाही. परंतु नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी आम्ही उत्साही असल्याचेही कपिल म्हणाला होता.

sharma

आपली प्रतिक्रिया द्या