कपिल शर्माने श्रद्धा व आदित्यला पाच तास ताटकळत ठेवले

सामना ऑनलाईन । मुंबई

‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आपला आगामी चित्रपट ‘ओके जानू’च्या प्रमोशनसाठी आलेले श्रद्धा कपूर व आदित्य रॉय कपूर यांना कपिल शर्माने तब्बल पाच तास वाट बघायला लावली. कपिलच्या या वागण्याने ते दोघेही प्रचंड वैतागले होते व सेटवरुन निघूनही जाणार होते. मात्र शोच्या दिग्दर्शकांनी दोघांचीही मनधरणी करत त्यांना थांबविले.

श्रद्धा व आदित्य हे शो च्या प्रॉडक्शन टिमने दिलेल्या वेळेनुसार संध्याकाळी चार वाजता सेटवर पोहोचले होते. तेथे शूटिंगची तयारी सुरु होती मात्र शोचा मुख्य होस्ट कपिल शर्माच गायब होता. बराच

काळ वाट बघूनही कपिल येत नाही बघून श्रद्धा तिथून निघून जात होती. मात्र दिग्दर्शक व प्रॉडक्शन टिमने तिला व आदित्यला थांबवून घेतले. त्यानंतर तब्बल चार तासांनी कपिल सेटवर पोहोचला आणि पाच तासांनी शो च्या शूटिंगला सुरुवात झाली.