कराड – कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे सप्तशतक, आत्तापर्यंत एकूण 704 जणांना डिस्जार्च

406

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज 34 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यापासून कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्यावर उपचार करण्यात येत असून बहुसंख्य रुग्ण बरे होऊन सुखरूपपणे आपल्या घरी जात आहेत. आत्तापर्यंत एकूण 704 जणांना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. तर आज 34 जण कोरोनामुक्त होऊन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

कृष्णा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुरेश भोसले, डॉक्टर अतुल भोसले विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. क्षिरसागर यांची टिम कसोशीने प्रयत्न करून अधिकाधिक रुग्ण बरे होण्याच्या दृष्टीने सकारात्मक काम करीत आहेत. कराड, पाटण बरोबरच सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नेराळे-पाटण येथील 59 वर्षीय पुरूष, शनिवार पेठ कराड येथील 42 वर्षीय पुरूष, रेठरे बुद्रुक येथील 54 वर्षीय महिला, 24 वर्षीय युवती, 34 वर्षीय महिला, पाटण येथील 20 वर्षीय युवती, वडोली – निळेश्वर येथील 48 वर्षीय पुरूष, आगाशिवनगर येथील 41 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, धावरवाडी येथील 33 वर्षीय पुरूष, 27 वर्षीय महिला, कार्वे येथील 65 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, शनिवार पेठ कराड येथील 76 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, वाठार – किरोली येथील 30 वर्षीय पुरूष, कोयना वसाहत येथील 35 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी, 7 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय पुरूष, वाठार येथील 35 वर्षीय पुरूष, येडेमच्छिंद्र येथील 31 वर्षीय पुरूष, नारायणवाडी येथील 35 वर्षीय पुरूष, शुक्रवार पेठ कराड येथील 70 वर्षीय पुरूष, 64 वर्षीय महिला, मलकापूर येथील 36 वर्षीय महिला, शेरे येथील 48 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 39 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरूष, भिलार महाबळेश्वर येथील 68 वर्षीय पुरूष, कालवडे येथील 21 वर्षीय युवक, नागठाणे येथील 18 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या