कराड – कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे त्रिशतक, आतापर्यंत एकूण 310 रूग्णांना डिस्चार्ज

492

सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 16 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 310 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे त्रिशतक पूर्ण केले आहे.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये उरूल-पाटण येथील 60 वर्षीय पुरूष, नवसरी-पाटण येथील 15 वर्षीय मुलगा, 17 वर्षीय मुलगा, 29 वर्षीय महिला, परभणी येथील 26 वर्षीय युवक, पाटण-सडादाडोली 29 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगी, 4 वर्षीय मुलगी, तुळसण येथील 50 वर्षीय पुरूष, हलवळेवाडी-बहुले येथील 28 वर्षीय युवक, तारूख येथील 40 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, काजरेवाडी-खळे येथील 35 वर्षीय पुरूष, जखिणवाडी येथील 52 वर्षीय पुरूष, 47 वर्षीय महिला, लटकेवाडी येथील 19 वर्षीय युवक अशा एकूण 16 जणांचा समावेश आहे.

यावेळी कोरोनाची लढाई यशस्वीपणे जिंकलेल्या या कोरोनामुक्त रूग्णांना तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस आर. पाटील, डॉ. नम्रता कदम, योगेश कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या