करण जोहरला एकता कपूरसोबत लग्न करायचं होतं, दोघेही अजून अविवाहीतच

5333

निर्माता करण जोहर आणि निर्माती एकता कपूर या दोघांचे नाव आईवडिलांचा वारसा पुढे नेणाऱ्या मुलांमध्ये सामील आहे. करण जोहरने चित्रपट क्षेत्रात नाव मिळवले तर एकता कपूरने मालिका विश्वात. हे दोघेही अविवाहीत आहेत असून या दोघांबाबत एक नवी माहिती उघड झाली आहे. करण जोहर याला एकता कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा होती.

करण जोहरने एका मुलाखतीमध्ये एकता कपूरसोबत लग्न करायची इच्छा व्यक्त केली होती. लग्नाबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तो म्हणाला होता की मला वाटत नाही की एकतापेक्षा कोणी अधिक चांगलं असेल असं मला वाटत नाही. जर मला आणि तिला चांगला साथीदार मिळाला नाही तर आम्ही एकमेकांशी लग्न करू असे त्याने म्हटले होते. असं काही झालं तर माझी आई सर्वात जास्त खूश होईल असंही करणने म्हटलं होतं. आमचं लग्न झालं तर मालिकांमध्ये पुढे काय होणार आहे हे आईला आधीच कळेल असं करण जोहर गंमतीत म्हटला होता. एकता कपूरनेही एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता की करण मला लग्नासाठी केव्हा विचारणार आहे ? एकताने म्हटलंय की करण हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. बॉलीवूडमध्ये आपले फार मित्र नाहीयेत, पण करण जोहर माझा जवळचा मित्र आहे. आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा गळाभेट घेतो. दुसऱ्या एका इंटरव्ह्यूमध्ये करण जोहरने एकतासोबतच्या लग्नाच्या बातम्या या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं होतं. जनसत्ताच्या वेबसाईटवर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या