समलैंगिकांच्या विवाहाला मान्यता द्या, करण जोहरने व्यक्त केली इच्छा

947

चित्रपट निर्माता करण जोहर याने समलैंगिक विवाहाला लवकरात लवकर मान्यता मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. करण जोहरने इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मध्ये ही इच्छा बोलून दाखवली आहे.

‘ज्या दिवशी समलैंगिक संबंधांना विरोध करणारा कलम 377 हा कायदा रद्द केला तेव्हा मी खूप रडलो होतो. माझ्या समाजासाठी रडलो. अखेर स्वातंत्र्य मिळालं म्हणून रडलो. आता सर्वांना समान वागणूक मिळणार. तो ऐतिहासिक निर्णय होता. मला आनंद वाटतोय की आता कायदेशीर याला मान्यता मिळाली आहे. आता मी समलैंगिक विवाहाला मान्यता मिळण्याची वाट पाहत आहे. ती आमची पुढची स्टेप असेल. मला आशा आहे की त्याला देखील लवकरच मान्यता मिळेल’, असे करणने यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या