‘कॉफी विथ करण’मध्ये तापसीला न बोलविण्यामागे काय आहे कारण? करण जोहरने केला खुलासा

बॉलीवूड सेलिब्रिटींची पोलखोल करणारा ‘कॉफी विथ करण’चा 7 वा सिझन नुकताच झाला. या सिझनमध्ये 12 एपिसोड टेलिकास्ट केले जातात. नुकताच या शोचा शेवटच्या एपिसोडचे शुटिंग झाले आणि यावेळी करणला तापसी पन्नूला शोमध्ये न बोलावण्याबाबत विचारणा करण्यात आली. तिच्या वक्तव्यावर करणने दिले असे उत्तर.

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने काही दिवसांपूर्वी करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोबाबत एक वक्तव्य केले होते. ते चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळी तिने करणच्या शोमध्ये न बोलविण्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. तिचा आगामी सिनेमा ‘दोबारा’ च्या प्रमोशन दरम्यान तिला पत्रकारांनी कॉफी विथ करणमध्ये न बोलविण्याबाबत विचारले असता तिने सांगितले, माझी सेक्स लाईफ इतकी मनोरंजन नाही की करण मला त्या शोमध्ये बोलवेल. तिची ही प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल झाली. आता करणने तापसीच्या त्या प्रतिक्रियेवर उत्तर दिले आहे.

‘कॉफी विथ करण’ 7 व्या सिझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये करण जोहरला तापसी पन्नूला शो मध्ये न बोलावण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना करण जोहर बोलला. या शो चे केवळ बारा एपिसोड होते. त्यात असे कॉम्बिनेशन बनवायचे असते जे एकमेकांसोबत जोडलेले असतील. तापसीला सांगू इच्छितो की, जेव्हा मी तिला विनंती करु शकेन आणि तिला शो मध्ये येण्यास सांगू शकेन. जिथे आम्ही एकत्र एक्सायटिंग कॉम्बिनेशनवर काम करु शकतो आणि तेव्हा तापसीने या शोमध्ये येण्यास नकार दिला तर मी दु:खी होईन.

करणचा हा शो अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. करण जोहरवर आरोप लावण्यात आले आहेत की तो या शो मध्ये खासगी गोष्टींवरच जास्त प्रश्न विचारतो. सेलिब्रिटींची सेक्स लाईफ, डेटिंग लाईफ वर तो जास्त लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे करणला ट्रोल केले जाते. करणवर आरोप आहे की, तो कॉफी विथ करणमध्ये आलिया भट्टचे कौतुक करत असते. तिला नंबर 1 अभिनेत्री असल्याचे सांगतो. तो आलियाला त्याच्या एपिसोडमध्ये प्रमोट करताना दिसले, तसेच करण सारा अलीकडे दुर्लक्ष करुन जान्हवी कपूरला फेवर करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कॉफी विथ करणमध्ये अनेक सिनेमांना प्रमोट केले जाते. आता चाहत्यांना’कॉफी विथ करण’ च्या 8 व्या सिझनची प्रतिक्षा आहे.