‘स्वत:वर ‘The Gay’ चित्रपट बनव’, नेटकऱ्याच्या ट्वीटला करण जोहरचे सडेतोड उत्तर

बॉलिवूडमधील यशस्वी चित्रपट निर्मात्यांमध्ये करण जोहर याचे नाव घेतले जाते. परंतु अनेकदा तो त्याच्या सेक्सुअलिटीवरून चर्चेत असतो. ट्विटरवर एका युझरला या विषयाला हात घालणे मात्र महागात पडले आहे. सेक्सुअलिटीवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युझरला करण जोहरने सडेतोड उत्तर दिले आहे.

ट्विटर युझरने करण जोहरला टॅग करून एक ट्वीट केले होते. यात त्याने करण जोहरला स्वत:च्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला होता. या चित्रपटाचे नाव ‘The Gay’ असे ठेवावे असेही युझरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते. या युझरला करण जोहरने व्यंगात्मक अंदाजात उत्तर दिले आहे.

करणने या ट्रोलरचे ट्वीट रिट्विट करताना लिहिले की, ‘तू खरंच खूप अभ्यासू आहेस. एवढे दिवस कुठे लपून बसला होता? आज ट्विटरवर सर्वात योग्य मुद्दा उचलल्यामुळे मी तुझे आभार मानतो.’ दरम्यान, इतर नेटिझन्सने देखील ट्रोलरची चांगलीच खेचली. करण जोहरला ट्रोल करायाला गेलेला हा युझर स्वत: ट्रोल झाला. यानंतर त्याने हे ट्वीट डिलिट केले.

आपली प्रतिक्रिया द्या