#MenToo जे झाले ते दोघांच्या संमतीने, करण ओबेरॉयचा दावा

54

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध फिटनेस मॉडेल करण ओबेरॉयला बलात्कार प्रकरणामध्ये मुंबईत अटक करण्यात आली आहे. करणने त्याच्यावरील आरोप खोटे असून त्याच्यात व आरोप करणाऱ्या महिलेत जे झाले ते दोघांच्या संमतीनेच झाल्याचा दावा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

करण ओबेऱॉय याचा वकिल दिनेश तिवारी याने दिंडोशी न्यायालयात जामीन अर्ज सादर केला असून त्यात त्याने करणचे व सदर महिलेचे मेसेजेच पुरावे म्हणून सादर केले आहेत. तसेच करण हा गेल्या 20 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्याच्याविरोधात एकही गुन्हा नसून तो त्याच्या प्रेमळ व व प्रामाणिक स्वभावासाठी ओळखला जातो, असे तिवारी यांनी न्यायालयात सांगितले आहे.

करण ओबेरॉय हा ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या टीव्ही शोमुळे घराघरात पोहोचला होता. तसेच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मोना सिंह हिचा तो माजी प्रियकर आहे. अभिनेता करणने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ तयार करून पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच पैसे न दिल्यास पीडितेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्याच्याविरोधात मुंबईतील ओशिवारा पोलीस स्थानकामध्ये भादवी कलम 376 (बलात्कार) आणि 384 (ब्लॅकमेल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या