ती जादूटोणा करते! करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार

588

अभिनेता करण ओबेरॉय याच्या बहिणीने एका ज्योतिषी महिलेवर जादूटोणा केल्याचा आरोप केला आहे. ही तीच महिला आहे जिने करण ओबेरॉवर बलात्काराचा आरोप केला होता. जून महिन्यात या आरोपी महिलेला स्वतःवर हल्ला झाल्याची खोटी तक्रार नोंदवण्यासाठी अटक झाली होती. आता करणच्या बहिणीनेही या महिलेविरोधात जादूटोणा करत असल्याची तक्रार पोलिसात दाखल केल्याचं म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, करण आणि त्याची बहीण गुर्बानी ओबेरॉय या दोघांनीही 2018च्या ऑक्टोबर महिन्यात या महिलेविरोधात एनसी दाखल केली होती. करणचे आई वडील गेल्या काही काळापासून शारीरिक त्रासांना सामोरे जात होते. गुर्बानी हिच्या म्हणण्यानुसार, ही ज्योतिषी महिला त्यांच्याविरोधात जादूटोणा करून त्यांना त्रास देण्याची धमकी देत होती. करणनेही याला पुस्ती जोडली असून मी बराच काळ हा त्रास सहन करत आहे. पण, तिच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. जादूटोणा करणं हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र, तिने महिला असल्याचा फायदा घेऊन आपल्याविरुद्ध बलात्काराचा आरोप केला, असं करणचं म्हणणं आहे.

महिलेच्या वकिलानेही ती अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सामील असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे हाच एक सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरून या महिलेला कडक शासन करावं, अशी अपेक्षा करणचे वकील दिनेश तिवारी यांनी बोलून दाखवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या