सैफ आणि करीनाच्या घरी आला छोटा पाहुणा!

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन झालं आहे. कलाविश्वातील या प्रसिद्ध जोडीने ही गोड बातमी शेअर केली आहे.

मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. करीनाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.

करीनाला मुलगा झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण फार आनंदात आहोत. तिने दुसर्‍या मुलाला ब्रीच कॅंडी रुग्णालयात जन्म दिला आहे. आता आम्ही तिकडे जात आहोत, अशी माहिती रणधीर यांनी दिली आहे.

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध जोडीवर सगळ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सैफ आणि करीनाला तैमूर नावाचा मुलगा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या