बड्डे लोग बड्डी बाते… करिनाच्या टी-शर्टची किंमत ऐकून थक्क व्हाल!

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचे सुपरस्टार आणि त्यांची लाईफस्टाईल याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. सध्या करिना कपूरच्या टी शर्ट आणि शूजची चर्चा होत आहे. वीरे दि वेडिंग सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर करिना कपूर आपला मुलगा तैमूरसोबत लंडनला रवाना झाली आहे. लंडनला जाण्यासाठी करिना मुंबई विमातळावर पोहोचली त्यावेळी तिने सफेद रंगाचा टीशर्ट आणि सफेद रंगाचे शूज घातले होते. या शूज आणि टी शर्टची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

करिना कपूरन घातलेल्या टी शर्टची किंमत ५६ हजार रुपये तर शूजची किंमत जवळपास ४० हजार रुपये आहे. करिनाचं सफेद कॉटन आणि पिंक प्रिटेंड टी- शर्ट गुसी (Gucci)ब्रँडचं आहे, तर शूज सेंट लॉरेन्ट (Saint Laurent) ब्रँडचे आहेत.

करिना सध्या लंडन येथे सुट्टीचा आनंद लुटायला गेली आहे. करिना सोनम कपूरच्या वाढदिवशी सोबत असणार आहे. वीरे दि वेडिंगच्या यशानिमित्त सिनेमातील कलाकार लंडन येथे एकत्र आनंद लुटणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या