अब वो बात नहीं रही! नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली ट्रोल

3479
kareena-kapoor-new

अभिनेत्री करीना कपूर सध्या तिचा पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या वीरे दि वेडिंग चित्रपटानंतर तिचा एकही चित्रपट आलेला नाही. पण, तरीही बेबो चांगलीच हिट असते. कारण, सोशल मीडियावर नसूनही व्हायरल होणारे तिचे फोटो. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे करीना चांगलीच ट्रोल झाली आहे.

kareena-no-makeup

करीनाच्या एका फॅन पेजवरून हा फोटो शेअर झाला होता. त्यात करिना नो मेकअप लूकमध्ये दिसत होती. एरवी तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारा तिचा चाहता वर्ग चांगलाच नाखूष झाला आणि तिला जोरदार ट्रोलिंग सुरू झालं. 38 वर्षांची करीना या फोटोत जरा जास्तच वयस्कर दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. ओल्ड करीना, कृपया डाएट बंद कर, आंटी करीना दिसतेस, अब वो बात नहीं रही अशा कमेंट्स करत त्यांनी तिला ट्रोल केलं.

अर्थात काही चाहत्यांना तिचा हा नो मेकअप लूक पसंत पडला. मेकअपशिवायही तिचा चेहरा गोरापान आणि नितळ दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या