करिना कपूर खान ‘प्लक’ची ब्रँड अम्बॅसेडर

‘प्लक’ या हिंदुस्थानातील एक जीवनशैलीभिमुख, ताज्या फळांच्या आणि भाज्यांच्या आघाडीच्या ब्रँडने प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खानशी करार केल्याचं जाहीर केले आहे. ही भागीदारी म्हणजे प्लकसाठी तर एक लक्षणीय मैलाचा दगड आहेच, पण या कंपनीत गुंतवणूक करून एक गुंतवणूकदार आणि ब्रँड अम्बॅसडर म्हणून करिना कपूर खानने देखील F & V उद्योगात आपले स्थान बळकट केले आहे.

मुंबईच्या मध्यात स्थित प्लक 15+ श्रेणींमध्ये 400 आगळ्यावेगळ्या आयटम ऑफर करते, ज्यांची वर्गवारी एसेन्शियल्स, एक्झॉटिक्स, हायड्रोप्रोनिक्स, कट्स अँड मिक्सेस वगैरे प्रकारे करण्यात आली आहे. या वैविध्यपूर्ण कॅटलॉगमध्ये DIY (डू इट यॉरसेल्फ) मील किट देखील सामील आहेत, जी प्रमाणित फूड-टेक सुविधांमध्ये बनवण्यात आली आहेत. आपल्या उपभोक्त्यांना ओझोनने धुतलेली उत्पादने, ट्रेस करण्याची क्षमता देणारी प्लक ही कंपनी ताज्या फळांच्या आणि भाज्यांच्या क्षेत्रात इनोव्हेशन करणारी आघाडीची कंपनी आहे.

एक्स्पोनेन्शिया व्हेंचर्सकडून सीड फंडिंग मिळवणाऱ्या प्लकची मुंबई, दिल्ली, बंगळूर आणि पुणे येथे दमदार उपस्थिती आहे आणि आगामी तिमाहीत विस्ताराची त्यांची योजना आहे. प्लकने आघाडीच्या मार्केटप्लेसेसवर आपली उपस्थिती विस्तारित केली आहे. त्यांची उत्पादने आता त्यांच्या स्वतःच्या अँन्ड्रॉईड आणि iOS अॅपवर तसेच अमेझॉन, स्विगी, डंझो, झेप्टो आणि रिलायन्स सिग्नेचर स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

गेल्या तिमाहीत या ब्रॅंडने 1 मिलियनपेक्षा जास्त उत्पादने विविध ऑफर्सद्वारे, आपल्या D2C आणि मार्केटप्लेस चॅनलच्या माध्यमातून विकली आहेत. DIY झूडल्स आणि कॉली राईस यांसारख्या अनोख्या उत्पादनांची उपस्थिती आणि खास बनवलेल्या ट्रेंड्स सेक्शनमुळे प्लक व्यापारी क्षेत्रात एक इनोव्हेटर आणि अग्रणी म्हणून स्थापित झाली आहे.

प्लक हा भारताचा पहिला प्रमाणित प्लॅस्टिक न्यूट्रल F & V ब्रॅंड आहे. प्लॅस्टिक कचरा कमी करण्याच्या पर्यावरण-जागरूक वचनबद्धतेच्या दिशेने उचललेले हे प्लकचे पहिले पाऊल आहे.

करिना कपूर खान म्हणाली, ‘एक गुंतवणूकदार आणि अम्बॅसडर या नात्याने प्लकशी संलग्न होताना मला आनंद होत आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि उच्च गुणवत्तेची फळे आणि भाज्या प्रदान करण्यात आघाडीवर असलेला हा ब्रँड आहे. एक आई म्हणून माझ्यासाठी व्यक्तिशः अन्नाची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. प्लकच्या लक्षणीय प्रवासात आणि देशभरात उपभोक्त्यांना सेवन करण्यासाठी योग्य अन्न प्राप्त करण्यास मदत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेत सहभागी होण्यास मी उत्सुक आहे’.