Photo – काजल ते माधुरी, चित्रिकरणादरम्यान प्रेग्नंट होत्या ‘या’ अभिनेत्री

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या कामाशी कधीही तडजोड करत नाहीत. काही अभिनेत्रींनी तर निर्मात्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रेग्नंट असतानाही चित्रिकरण पूर्ण केले आहे. या दरम्यान त्यांना अनेक समस्यांचाही सामना करावा लागला, तर काहींना खोटंही बोलावे लागले. जाणून घेऊया…

1. काजल अग्रवाल

kajal-aggarwal

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल ही प्रेग्नंट आहे. याच कारणामुळे तिला नागार्जुन स्टारर चित्रपट ‘द घोस्ट’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र अभिनेत्रीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

2. माधुरी दीक्षित

madhuri-dikshit

‘देवदास’ या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी माधुरी दीक्षित प्रेग्नंट होती. मात्र प्रेग्नंट असतानाही तिने चित्रपटातील गाण्यांचे चित्रिकरण पूर्ण केले होते.

3. करीना कपूर-खान

kareena-kapoor

करीना कपूर-खान चित्रिकरणादरम्यान दोनदा प्रेग्नंट राहिलीय. पहिल्यांदा ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटावेळी आणि दुसऱ्यादा ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावेळी. तरीही तिने चित्रिकरण पूर्ण केले.

4. जुही चावला

juhi-chawla

अभिनेत्री जुही चावला ‘झंकार बीट्स’ या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी प्रेग्नंट होती. मात्र तरीही तिने चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण विनातक्रार पूर्ण केले.

5. काजोल

kajol

अभिनेत्री काजोल ‘वी आर द फॅमिली’ या चित्रपटावेळी प्रेग्नंट होती. असे असतानाही तिने चित्रपटाचे चित्रिकरण थांबवले नाही.

6. हेमा मालिनी

hema-malini

हेमा मालिनी या ‘रजिया सुल्तान’ या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी प्रेग्नंट होत्या. मात्र त्यांनी कोणताही आढावेढा न घेता या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले.

आपली प्रतिक्रिया द्या